अक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य माहित आहे का?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारने पन्नाशी ओलांडली आहे. परंतु, त्याचा फिटनेस आजही जबरदस्त आहे. अक्षण नेहमी इंडिस्ट्रिजमधील पार्टीकल्चरपासून दूर राहिला आहे. शिवाय त्याचा दिनक्रम तो कधीही मोडत नाही. पहाटे साडेचारला तो उठतो. रात्री नऊ वाजता झोपतो. रात्रपाळीचे काम तो शक्यतो टाळतो. तो बास्केटबॉल खेळतो, स्विमिंग करतो, यामुळे त्याचा स्टॅमिना टिकून आहे.
वयाच्या ५० व्या वर्षीही अक्षय कुमार जबरदस्त फिट आहे. संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये तो पार्टीज आणि अल्कोहलपासून दूर राहण्यासाठी ओळखला जातो. तो नियमित सकाळी ४.३० वाजता उठतो आणि रात्री ९ वाजता झोपतो. तो नाइट शिफ्ट अव्हॉइड करत असतो. आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी तो आठवड्यातून दोन-तीन वेळा बास्केटबॉल खेळतो. वेळ मिळाल्यावर तो मुलासोबत स्विमिंगही करतो. त्याच्या फिटनेसचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत.

अक्षण कुमार ब्रेकफास्टमध्ये पराठा, एक ग्लास दूध, ज्यूस किंवा मिल्कशेक आणि अंडी घेतो. स्नॅक्समध्ये फ्रूट्स, डड्ढाय फ्रूट्स आणि मिक्स हिरव्या भाज्या खातो. लंचमध्ये अक्षण डाळ, चपाती, हिरव्या भाज्या बॉइल्ड चिकन आणि दही घेतो. तर डिनरमध्ये सूप, हिरव्या भाज्या आणि सलाद तो खातो. त्याला ब्राउन राइस आवडतो. अक्षय नेहमी जे नऊ नियम पाळतो हे नऊ नियम कोणते आहेत तेही आपण जाणून घेऊया. अक्षण संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत डिनर करुन घेतो. झोपण्याच्या ४-५ तासांपुर्वी जेवण घेणे हा त्याचा नियम आहे. यामुळे झोपेच्या वेळेपर्यंत जेवण पुर्णपणे डायजेस्ट होते. तो प्रोटीन शेक घेत नाही. यामुळे दिर्घकाळानंतर दुष्परिणाम होतात असे त्यास वाटते.

तो साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात खातो. हेल्दी राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तो मानतो. तो निमयित कमीत कमी अर्धा तास मेडिटेशन करतो. यामुळे शांती मिळते आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते. तो आपल्यासोबत नट्स आणि फ्रूट्स ठेवतो. जेव्हा भूक लागेल तेव्हा हे पदार्थ खातो. दिवसभरात तो ४ ते ५ लीटर पाणी पितो. मेटाबॉलिज्म रेट वाढवणारे पदार्थ तो खातो. मेटाबॉलिज्म योग्य असेल तर फिटनेस राहतो आणि वजन वाढत नाही, असे तो मानतो. तो कधीच जास्त जेवण करत नाही. तो थोड्या-थोड्या अंतराने खातो. ज्यावेळी तो एक्सरसाइज करत नाही तेव्हा तो १५ ते २० मिनिटे क्विक वॉक घेतो. रोज तो काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी अवश्य करतो. हेच त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे.