भाऊ असावा तर असा ! ‘कोरोना’च्या संक्रमणापासून बहिणीचं रक्षण करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं बुक केली ‘मुंबई-दिल्ली’ची पूर्ण फ्लाईट !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात चौथ्यांदा लॉकडाऊन सुरू आहे. अशात विमान सेवाही सुरू झाली आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यानं त्याची बहिण आणि मुलांना मुंबईवरून दिल्लीला पाठवण्यासाठी एक विमानच बुक केलं आहे. हा किस्सा समोर आल्यानंतर सर्वजण अक्षयचं कौतुक करत आहेत.

अक्षयनं पूर्णच्या पूर्ण विमान यासाठी बुक केलं की, त्याची बहिण आणि तिची मुलं कोरोनाच्या संक्रमणापासून दूर रहावीत. समोर आलेल्या माहिती नुसार मुंबई ते दिल्ली जाणारी अशी एकच फ्लाईट होती ज्यात खूप कमी प्रवासी होते. यात अलका हिरानंदानी आणि तिच्या मुलांची नावं आहेत. ही फ्लाईट अक्षयच्या कार्यालयातून बुक करण्यात आली होती.

फ्लाईट बुक करताना अशीही काळजी घेतली गेली होती की, ज्या सीटवर त्याची बहिण आणि मुलं होती त्याच्या आसपासचे सर्व सीट बुक झाले आहेत. असा हेतू नव्हता की, इतर कोणी प्रवास करूच नये. मुंबई एअरपोर्टवरील सूत्र सांगतात की, ज्या फ्लाईटमध्ये अक्षयची बहिण होती त्यात तिच्या बहिणीच्या कुटुंबियांव्यतिरीक्त फक्त त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब आणि अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.