नरेंद्र मोदींच्या विजयाबद्दल अक्षय कुमारने दिल्या ‘अशा’ अंदाजात शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वात एनडीएच्या विजयानंतर बॉलिवूड कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना शुभेच्छा दिल्या. या यादीत धर्मेंद्र, अजय देवगण, वरूण धवन, हेमा मालिनी सहित अनेक नावांचा समावेश आहे.

यानंतर आता अनेक कलाकारांनंतर सुपरस्टार अक्षय कुमारने देखील पीएम नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहे. नरेंद्र मोदींचा विजय ऐतिहासिक असल्याचं त्याने म्हटलं आहे. शिवाय त्याने मोदींना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. अक्षने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये अक्षय कुमार म्हणतो की, “आदरनीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन. तुम्ही देशाला आधुनिक करण्यासाठी आणि देशाच्या जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे कष्ट घेतलेत ते कौतुकास्पद आहे. तुमच्या दुसऱ्या यशस्वी टर्मसाठी तु्म्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.” असे म्हणत अनोख्या शब्दात अक्षय कुमारने नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनाही त्याने आपल्या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या अक्षय कुमार हाऊसफुल 4 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षय व्यतीरिक्त बॉबी देओल, रितेश देशमुख, किर्ती खरबंदा हे कलाकारदेखली दिसणार आहे. अक्षयने गुड न्यूज या सिनेमाची शुटींगही पूर्ण केली आहे.