… म्हणून अक्षय कुमार मुलांना त्याचे काही चित्रपट दाखवू इच्छित नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तो सतत चर्चामध्ये असतो. सध्या अक्षय आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खुप व्यस्त आहे. एका अ‍वाॅर्ड प्रोग्रॅममध्ये अक्षय दिसून आला. त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका आपटे, आणि अभिनेता विकी कौशल होते. यावेळी अक्षय कुमारला एक प्रश्न विचारण्यात आला. विकी कौशलने अक्षयला पंजाबीमध्ये प्रश्न विचारला की, तुमचा कोणता चित्रपट आहे जो तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकत नाही ?

अक्षय कुमार हसत म्हणाला की, एक चित्रपट आहे, जो मी माझ्या मुलांना दाखवू शकत नाही. तो म्हणजे ‘गरम मसाला’ या चित्रपटात मी एकावेळी ३ ते ४ मुलींसोबत डेटला गेलो आहे. या कॉमेडी चित्रपटात माझी भूमिका वेगळी आणि दिलफेंक होती. मला मुलांना समजावून सांगायचे आहे की, काळ बदलला आहे. आजकाल मुलींकडे मेकअप सामानापेक्षा ट्रेकींगचे खुप सामान असते. ती तुम्हाला ट्रेक करेल. यासाठी या गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

पुन्हा विकी कौशलने अक्षयला प्रश्न विचारला की, पत्नी ट्विंकल खन्ना एक आभिनेत्री म्हणून जास्त आवडेल की एक लेखिका म्हणून ? तेव्हा अक्षयने खुप छान उत्तर दिले. ट्विंकल मला पत्नी म्हणून आवडेल.

अक्षय सध्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर खान, कियारा आडवाणी, दिलजीत दोसांझ दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like