‘खिलाडी’ अक्षयच्या प्रोड्युसरला 6 महिन्यांची जेल, ‘फ्रॉड’ केल्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा सिनेमा टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन सिनेमाची प्रोड्युसर प्रेरणा अरोरा हिच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं प्रेरणा अरोराला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 6 महिन्यांची जेल सुनावली आहे. याशिवाय कोर्टानं तिला पुढील शिक्षा भोगण्यासाठी 2 मार्चपर्यंत मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरेंडर करण्यासाठीही सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार, प्रेरणानं मुंबई उच्च न्यायालयाच्या डिव्हीजन बेंचच्या समोर आदेशाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टानं पुढील सुनावणीसाठी 23 मार्चची तारीख दिली आहे. असंही सांगितलं जात आहे की, प्रोड्युसर प्रेरणाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पोलिसांना असे निर्देश देण्यात आले आहेत तिनं सरेंडर केलं नाही तर तिला अटक करण्यात यावी.

आपली उधारी न दिल्यानं प्रेरणा अरोराला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. जवळपास 8 महिन्यांच्या जेलनंतर तिला जामीन मिळाला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तिनं सांगितलं होतं की, ती आता नवीन सुरुवात करणार आहे. यानंतर आता अवमानाप्रकणी कोर्टानं तिला सरेंडर करण्यासाठी सांगितलं आहे.

प्रेरणावर आरोप आहेत की, तिनं वासु भगनानीकडून पॅडमॅन आणि केदारनाथ या सिनेमांसाठी पैस उसणे घेतले होते. हे पैसे तिनं परत केले नाहीत. तिच्यावर 31.60 कोटींचा फ्रॉड केल्याचा आरोप होता. यानंतर मुंबई इकोनॉमिक ऑफिस विंगनं प्रेरणाला अरेस्ट केलं होतं.