‘खिलाडी’ अक्षय कुमारनं पत्नीसाठी आणल्या चक्क कांद्याच्या ‘इयररिंग्स’, करिनाला नाही आवडल्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कांद्यावरून पूर्ण देशात सध्या गोंधळ सुरू आहे. सर्व लोक कांद्याच्या किंमतीमुळे वैतागले आहेत. सोशलवर कांद्याला घेऊन अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. अशात अभिनेता अक्षय कुमारनं आपली पत्नी ट्विंकल खन्नासाठी कांद्याच्या इयररिंग्स आणल्यानं चर्चेत आला आहे. ट्विंकलनं इयररिंग्सचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय आणि ट्विंकल खन्ना असे कपल आहेत जे प्रत्येक लहान लहान गोष्ट एन्जॉय करताना दिसतात. सेलेब्रिटी लोक नेहमीच सामान्य माणसांचे मुद्दे सोशल मीडियावर उलचून धरतच असतात. सध्या कांद्याचा मुद्दाही सोशलवर गाजताना दिसत आहे.

ट्विंकल खन्नानं शेअर केलेले कांद्याचे कानातले सध्या सोशलवर चांगलेच चर्चेत आहेत. ट्विंकलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ऑनियन इयररिंग्स. माझ्या पार्टनरनं कपिल शर्मा शोमधून परत आल्यानंतर माझ्यासाठी आणल्या आहेत. अक्षयनं मला सांगितलं की, या कांद्याच्या इयररिंग्स सेटवर शुटींगसाठी करिनासाठी आणल्या होत्या. परंतु तिला आवडल्या नाहीत म्हणून तुझ्यासाठी घेऊन आलो.”

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like