‘खिलाडी’ अक्षयचा लक्ष्मी IMDb वर अपयशी, सर्वांत कमी रेटिंगच्या यादीत समावेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु चाहत्यांना हा सिनेमा फारसा भावला नसल्याचं दिसत आहे. अनेकांनी सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमा पाहून वेळ वाया घालवल्यासारखं वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील लक्ष्मी अपयशी ठरला आहे. सिनेमाला 10 पैकी 2.6 रेटिंग मिळाली आहे.

असंही सांगण्यात येत आहे की, आयएमडीबी (IMDb) वर कमी रेटिंग मिळालेल्या पहिल्या 10 सिनेमांमध्ये लक्ष्मी सिनेमाचा समावेश झाला आहे. लक्ष्मीला आतापर्यंत 6000 रेटिंग मिळाले आहेत. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. यापूर्वीही सडक 2, रेस 3, गुंडे, हिंमतवाला, रामगोपाल वर्मा यांचा आग, कर्ज, जोकर या सिनेमांना कमी रेटिंग मिळालं आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुड न्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा इंदू की जवानी, भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. नुकताच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.