Advt.

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लाँचिंगला 7.5 लाखांच्या बाईकवर आला ‘खिलाडी’ अक्षय, जाणून घ्या फीचर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या आगामी सिनेमाचा ट्रेलर कालच (सोमवार दि 3 मार्च 2020) रिलीज झाला. ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला अक्षयनं बाईकवरून जबरदस्त एन्ट्री मारली. ही बाईक होती होंडा सीबीआर 650 एफ. लाल, काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या या बाईकवर अक्षयची स्टाईल खरचं पाहण्यासारखी होती. त्याला ही बाईक खूप सूट करत होती यात शंका नाही. या बाईकचे फीचर आणि किंमत तुम्हाला हैराण करेल.

सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचिंगला होंडाची जी बाईक घेऊन अक्षय आला होता, त्या होंडा सीबीआर 650 एफ बाईकची किंमत जवळपास 7.5 लाख रुपये एवढी आहे. जर तुम्हाला ही बाईक घ्यावी असं वाटलं तर कदाचित तुम्हाला 8 लाखांहून अधिक किंमत मोजावी लागेल. खरं तर गेल्या वर्षीच होंडा या बाईकची विक्री करणं बंद केलं आहे.

बाईकच्या फीचरबद्दल बोलायचं झालं तर ही बाईक 21 किमी प्रति लिटरचं मायलेज देते. 170 किमी प्रति तासाच्या स्पीडनं ही बाईक पळू शकते. या बाईकमध्ये 8500 आरपीएम वर 60.5 एनएम चा टॉर्क मिळतो. लिक्विड कूल्ड इन लाईन फोर सिलेंडर वाली ही बाईक 648.7 cc च्या इंजिनसोबत मिळते. काही सेकंदातच ही बाईक जास्तीत जास्त स्पीड पकडते. याचे रुंद टायर प्रवास आणखी सुरक्षित बनवतात.