Akshay Kumar On The Kashmir Files | अक्षय कुमारने ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटावर केलं वक्तव्य; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Akshay Kumar On The Kashmir Files | नुकताच बॉलिवूडचा ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवार 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या दोनच दिवसांमध्ये या चित्रपटाने खूपच चांगली कामगिरी केली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Akshay Kumar On The Kashmir Files)

 

अशातच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने ‘द काश्मिर फाइल्स’वर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तो म्हणाला की, मी अजूनपर्यंत हा चित्रपट पाहिलेला नाहीय. पण मी हा चित्रपट लवकरच बघेन असं त्याने सांगितलं. त्याचबरोबर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असून, प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूपच आवडला असल्याचंही त्याने सांगितले.

 

तसेच अक्षय कुमारने बॉलिवूड अभिनेता ‘अनुपम खेर’ यांच्याविषयीही वक्तव्य केलं आहे.
अनुपम खेर यांनी केलेल्या कामाबद्दल मी खूपच ऐकत असल्याचं तो म्हणाला.
अक्षयने ही प्रतिक्रिया आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट (Twitter) करत केली आहे.

 

ही खूपच चांगली गोष्ट आहे की, चित्रपटगृहात पुन्हा एकदा पूर्वीसारखी गर्दी पाहायला मिळतं आहे.
मी लवकरात लवकर हा चित्रपट पाहायचा प्रयत्न करेल.
तसेच ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटाबरोबर ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) हा देखील चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 

Web Title :- Akshay Kumar On The Kashmir Files | the kashmir files celebs reactions akshay kumar praises anupam kher film says will watch soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

#द कश्मीर फाइल्स सेलेब्स रिएक्शन्स #द कश्मीर फाइल्स #अक्षय कुमार अनुपम खेर फिल्म #अक्षय कुमार द कश्मीर फाइल्स #Entertainment Movies Bollywood #Entertainment #Bollywood #The Kashmir Files Celebs Reactions #The Kashmir Files #Akshay Kumar on Anupam Kher film #Akshay Kumar on The Kashmir Files