‘या’ अभिनेत्याचे 14 सिनेमे ‘डब्यात’, पण आज देतोय ‘भाईजान’ सलमान, ‘किंग’ शाहरूख आणि आमिर खानला ‘टक्‍कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर आता चित्रपटाचा चौथा भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या 25 वर्षांपासून अक्षय स्क्रिनवर राज्य करतोय. मात्र अक्षय कुमारचा इथेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. एक काळ असा आला होता की त्याचे करिअर संपुष्टात आले होते.

एका मुलाखतीत अक्षय कुमारने सांगितले की , ‘माझे 14 सिनेमा फ्लॉप झाले होते त्यानंतर एक अभिनेता म्हणून माझं करिअर संपले असे वाटू लागले. त्यावेळी मार्शल आर्टची ट्रेनिंग कामी आली. त्याने मला नियमात राहणं शिकवले. 14 फ्लॉप झालेल्या सिनेमांनी देखील मला खूप काही शिकवले. ‘

अक्षयचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. मैं खिलाडी तू अनाडी, मोहरा, सबसे बडा खिलाडी, मिस्टक एंड मिसेज खिलाडी आणि खिलाडियों का खिलाडी असे अनेक हिट सिनेमे त्याने दिले आहेत . सध्या तो हाऊसफुल 4 च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हाऊसफुल 4 ‘या चित्रपटात अक्षय कुमार, क्रीती सॅनन, बॉबी देओल, पूजा हेगडे, क्रीती खरबंदा आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यात 1419 आणि 2019 असे दोन काळ आपल्याला पाहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com