Akshay kumar | अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप

पोलीसनामा ऑनलाइन : Akshay kumar | ‘हेराफेरी 3’ मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार हा चांगलाच चर्चेत आला आहे. एवढेच नाही तर यंदाच्या वर्षी त्याचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप ठरल्यानेदेखील त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून आले, तर अक्षयने नुकतीच ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणादेखील केली आहे. या सोहळ्यात त्याच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटावरही आक्षेप घेण्यात आला होता. यावर त्यांनी स्वतः उत्तर दिले आहे. (Akshay kumar)

‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’ हे सौदीमध्ये आयोजित केले होते आणि याच सोहळ्यात अक्षयला एका पाकिस्तानी माणसाने ‘बेल बॉटम’ या चित्रपटाबाबत काही गोष्टी खटकल्याचे सांगितले. या चित्रपटांमध्ये पाकिस्तानचे चित्रण योग्य नसल्याचा दावा या माणसाने केला होता, तर हा चित्रपट भारतीय हेरगिरी विश्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटावर आक्षेप घेत त्या व्यक्तीने म्हटले की, “सर मी तुमच्याच शेजारच्या देशातून म्हणजेच पाकिस्तानमधून आलो आहे. तुम्ही ‘टॉयलेट’, ‘पॅडमॅन’ यांसारखे उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असता. तुमचे हे चित्रपटदेखील आम्हाला खूपच आवडले आहेत. मात्र यंदाचा तुमचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट काहीसा मला खटकला आहे. यातील पाकिस्तानशी संबंधित काही गोष्टी योग्यरीत्या दाखवण्यात आलेल्या नाहीत. ज्या आम्हाला खटकल्या आहेत”. (Akshay kumar)

त्याच्या या बोलण्याने अक्षय म्हणाला की, “सर हा केवळ चित्रपट आहे. याला चित्रपटाच्या दृष्टिनेच पाहा एवढे गांभीर्याने याकडे बघू नका. तो फक्त एक चित्रपट आहे”.
अक्षयने अगदी शांतपणे त्याच्या या प्रश्नाचे निरसण केले, तर ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत तिवारी
यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने गुप्तहेरची भूमिका निभावली आहे.
अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो आता ‘सेल्फी’, ‘गोरखा’ आणि ‘ओह माय गॉड’ या आगामी चित्रपटांत झळकणार आहे.

Web Title :- Akshay kumar | pakistani fans says bell bottom film has things against pakistan akshay kumar answers immediately

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू