‘खिलाडी’ अक्षय देणार ‘किंग’ खानला टक्कर ! सायन्स फिक्शन सिनेमात साकारणार ‘डबल रोल’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच अभिनेता शाहरुख खान (ShahRukh Khan) याच्या पठाण (Pathan) सिनेमाला टक्कर देणार आहे. शाहरुख आपल्या आगामी सिनेमात डबल रोल करणार आहे, तर अक्षय कुमारदेखील आपल्या आगामी सिनेमात डबल रोल करणार आहे. अक्षयनं याची तयारीही केली आहे. हा सिनेमा सायन्स फिक्शन फिल्म असणार आहे. यात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचा (VFX) चा वापर केला जाणार आहे.

या सिनेमासाठी अक्षयनं पुन्हा एकदा जगन शक्ती सोबत हात मिळवला आहे. अक्षय आणि डायरेक्टर जग यांचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्यांनी मिशन मंगलमध्ये एकत्र काम केलं होतं. सिनेमाचं नाव अद्याप फायनल झालेलं नाही. कलाकारांबद्दलही अद्याप जास्त काही माहिती समोर आलेली नाही. परंतु हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. हा सिनेमा सायन्स फिक्शन कॅटेगरीतील आहे. आजवर अक्षयचा या कॅटेगरीत कोणताही सिनेमा हिट झालेला नाही.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. आता त्याच्याकडे राम सेतू हाही सिनेमा आहे.