‘या’ ऐतिहासिक बायोपिकमधून ‘मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'या' ऐतिहासिक बायोपिकमधून ‘मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करणार बॉलिवूड प्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेन्ड सुरु आहे. त्यामध्ये आता पृथ्वीराज चौहान यांच्या ऐतिहासिक बायोपिकची भर पडत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर दिसणार आहे.

‘पिंकव्हीला’ या वेबसाइटच्या वृत्तानुसार मानुषी लवकरच अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मानुषीने हा चित्रपट साइन केला असून यात ती ‘संयुक्ता’ची भूमिका साकारणार आहे. मानुषी छिल्लरच्या बॉलीवूड प्रवेशाविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तिच्या बॉलिवूड पदार्पणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

https://www.instagram.com/p/BwEbHfXnxVC/?utm_source=ig_web_copy_link

बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट असल्याने मानुषी आपल्या डेब्यूसाठी विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी ती कार्यशाळेत अभिनयासोबत नृत्याचे धडे घेत आहेत. हा ऐतिहासिक बायोपिक चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित करणार आहेत.

पृथ्वीराज चौहान यांचा जन्म वर्ष ११६६ साली झाला होता. अजमेरचे महाराजा सोमेश्वर चौहान हे त्यांचे वडील. पृथ्वीराज चौहान यांना दिल्लीचे अखेरचे हिंदू राजा असंही म्हटले जाते. ११९१ साली झालेल्या तराइन युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घुरीचा पराभव केला होता.