‘बॅड बॉइज’चा हिंदी ‘रिमेक’ बनवणार रोहित शेट्टी ! ‘अक्षय-रणवीर’ला करणार ‘कास्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग सध्या आपल्या करिअरच्या शिखरावर आहेत. दोघांचेही सिनेमे सतत हिट होताना दिसत आहेत. जर दोघेही तुम्हाला एकाच सिनेमात काम करताना दिसले तर तुम्हाला कसं वाटेल ? रिपोर्ट्सनुसार लवकरच दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.

डायरेक्टर रोहित शेट्टीनं नुकताच खुलासा केला आहे की, तो प्रसिद्ध हॉलिवूड फिल्म बॅड बॉईजचा हिंदी रिमेक बनवणार आहे. यासाठी त्यांनं त्याची आवडती स्टार कास्टही फायनल केली आहे. नेहा धुपियाच्या चॅटशोमध्ये रोहितनं सांगितलं की त्याला कधी बॅड बॉईजचा हिंदी रिमेक बनवायचा झाला तर यात अक्षय कुमार आणि रणवीर सिंगला कास्ट करेल.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना रोहित म्हणाला होता की, बॅड बॉईज त्याच्या आवडत्या फ्रेंचायजी पैकी एक आहे. त्याला विल स्मिथ सोबत मार्टीन लॉरेंसची केमिस्ट्री खूप आवडते. रोहितनं हेही सांगितलं की, 2011 साली त्याला बॅड बॉईजचा रिमेक बनवायचा होता परंतु नंतर मात्र तो आपलं कॉप युनिव्हर्स क्रिएट करण्यात बिजी झाला. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचे अद्याप एकूण चार सिनेमे बनले आहेत. यात सिंघम, सिंघम 2, सिंबा आणि सूर्यवंशी या सिनेमांचा समावेश आहे.

रोहित सूर्यवंशी सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिनेमाची झलक अनेकदा पहायला मिळाली आहे. चाहत्यांना आता सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.