Laxmii ला मिळालेल्या Review वर बोलताना ‘खिलाडी’ अक्षय म्हणाला, अनेक क्रिटिक्सला माझा सिनेमा आवडला नाही, परंतु…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. लक्ष्मी सिनेमानं रिलीज होताच इतिहास रचला आहे. एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज होणारा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा म्हणून हा सिनेमा समोर आला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मिश्र प्रतिक्रियांवर आता अक्षय कुमारनं भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की, हा सर्वांत जास्त मेंटली इंटेस रोल होता. सिनेमाला मिळालेल्या मिक्स प्रतिसादावर बोलताना अक्षयनं सांगितलं की, मला माहीत आहे की, अनेक क्रिटिक्सला माझा सिनेमा आवडलेला नाही. परंतु माझा फोकस माझ्या प्रेक्षकांवर आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, हा सिनेमा माझ्या करिअरमधील सर्वांत मोठी ओपनिंग देणारा हा सिनेम आहे. अक्षयनं पुढं सांगितलं की, एका ट्रा्सजेंडरच्या लिडमध्ये असणं LGBTQ कम्युनिटीच्या अधिकारांना मजबूत करणं आहे. मग तो पॅडमॅन असो किंवा टायलेट एख प्रेम कथा, मिशन मंगल असो त्यांच्या मागे हीच भावना असते की, लोकांना एंटरटेन करण्यासोबत त्यांना मेसेजही देणं आणि सिनेमांना बॉक्स ऑफिसवर यश मिळवून देणं. मला बदल घडवायचा आहे.

रिलीज झाल्याच्या काही तासांतच लक्ष्मी सिनेमानं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. या सिनेमात अक्षय कुमारनं पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी पहिल्या दिवशीच लॉगईन आहे आणि या सिनेमाला या प्लॅटफॉर्मवर सर्वांत जास्त पाहिला जाणारा सिनेमा बनवलं आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.