Video : …म्हणून बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही; ‘खिलाडी’ अक्षय ! स्वत:च कारण सांगत केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. आता लवकरच अक्षय रामसेतू या आगामी सिनेमात दिसणार आहे. याचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर सिनेमाबद्दल खूप चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार सांगतो की, तो बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जात नाही. त्यानं यामागील कारणही सांगितलं आहे.

अक्षय कुमारचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात तो कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. यात कपिल अक्षयला विचारतो की, तुमच्याबद्दल अशी अफवा आहे की, तुम्ही यासाठी पार्टीला जात नाहीत. कारण नंतर तुम्हालाही त्यांना पार्टी द्यावी लागते. यावर बोलताना अक्षय लगेच म्हणाला की, होय हे खरं आहे. हे ऐकताच सेटवरील सर्व लोक हसू लागले.

अक्षयनं याआधीही पार्टीत न जाण्याचं कारण सांगितलं आहे. करण जोहरच्या शोमध्ये अक्षय म्हणाला होता की, मला माझी झोप खूप प्रिय आहे. आणि सकाळ पाहायला मला खूप आवडते. जे लोक मला पार्टीला बोलवतात त्यांना माहीत आहे की, मी लवकर परत जाईन. मला हेही सांगायचं आहे की, मला नाईट शिफ्ट अजिबात आवडत नाही.