एकाच वेळी 3 अवतारात दिसला ‘खिलाडी’ अक्षय, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय तीन भूमिकांमध्ये दिसत आहे. अक्षय कुमारनं तीन भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. अक्षय कुमारनं शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, अक्षय मुलगा, वडिल आणि आजोबा अशा तीन अवतारात दिसत आहे.

अक्षय हे तीन अवतार नेमके कशातले आहेत हे अद्याप समजलेलं नाही. अक्षयचे हे लुक एखाद्या सिनेमासाठी आहे की, एखाद्या ब्रँडसाठी त्यानं हे केलं आहे हे मात्र चाहत्यांना समजलेलं नाही. कारण नमकीनच्या या ब्रँडनं भूतकाळात अनेक स्टार्सना आपल्या जाहिरातीत घेतलं आहे. अक्षयचा हजरजबाबीपणा आणि ब्रँडची लोकप्रियता मेळ खात आहे.

या फोटोतून ब्रँड असे संकेत देत आहे की, तो कौटुंबिक मनोरंजनातील सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे किंवा मग या वर्षी अक्षय कुमार एखाद्या मसालेदार रोलमध्ये पडद्यावर दिसणार आहे याचा मात्र खुलासा झालेला नाही.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय अक्षय पृथ्वीराज या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत असेल.

You might also like