Akshay Kumar | अक्षय कुमारने 3 मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा रचला नवा विक्रम; 3 मिनिटांत घेतले इतके सेल्फी

पोलीसनामा ऑनलाइन : Akshay Kumar | बॉलिवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षयने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. यावेळी अक्षयने तीन मिनिटात सर्वाधिक सेल्फी घेण्याचा नवा विक्रम केला आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत अक्षयने आयोजित फॅन मीट-अँड-ग्रीट इव्हेंटमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने सध्या त्याचे काही फोटोज शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. (Akshay Kumar)

अक्षयने instagram वर काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी त्याने म्हटले की, “मी हे जे काही मिळवलं आहे ते केवळ तुमच्यामुळेच आहे. मी आता आयुष्यात इथपर्यंत पोहोचलो ते माझ्या चाहत्यांमुळेच त्यांच्या प्रेमामुळेच. आज मला हे सर्व साध्य झाले आहे केवळ त्यांच्यामुळेच. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल त्यांना माझे हे त्रिब्युट आहे आणि आज माझा त्यांच्याच मदतीने आम्ही तीन मिनिटात सर्वाधिक सेल्फीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे सर्वांचे खूप खूप आभार हे खूप भारी होतं जे माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील”. (Akshay Kumar)

अक्षयने तीन मिनिटात 184 सेल्फी काढले आहेत.
त्याच्या विक्रमानंतर चाहते त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
सेल्फी या चित्रपटात अक्षय कुमार हा एका सुपरस्टारच्या भूमिकेत झळकणार आहे तर इम्रान हाश्मी हा
त्याच्या चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एका सेल्फी वरून सुरू झालेली ही कथा पुढे रंजक वळण कशी घेते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Web Title :- Akshay Kumar | selfiee actor akshay kumar breaks guinness world record for most selfies in 3 minutes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Swapnil Joshi | मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत; म्हणाला ‘या’ अभिनेत्रीबरोबर करायचे होते काम