Video : ‘खिलाडी’ अक्षयचे हेलिकॉप्टर, बाईकवर ‘स्टंट’ ; पहा ‘सूर्यवंशी’चा मेकिंग व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टंटसाठी प्रसिद्ध असणारा खिलाडी उर्फ अक्षय कुमार सध्या आपला अपकमिंग चित्रपट ‘सुर्यवंशी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार या चित्रपटाची शूटिंग बॅंकॉकमध्ये करत आहे. सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारा अभिनेता अक्षय कुमार वारंवार चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच अक्षयने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याचा एक व्हिडिओ देखील चाहत्यांच्या समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षयने हेलीकॉप्टरवर लटकताना दिसत आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर रोहित शेट्टी देखील बाइक चालविताना दिसत आहे.

अक्षय कुमारने हा फोटो शेअर करून लिहले की, ‘बस यूं ही हेलीकॉप्टर पर लटकते हुए… शूटिंग का एक और दिन.’ असे लिहून या खतरनाक स्टंटचा फोटो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे पण त्याने असे स्टंट न करण्याची विनंती देखील चाहत्यांना केली आहे. अक्षय कुमारने फोटो शेअर करुन लिहले की, कृपया हा स्टंट कोणी करु नका. हे सगळे स्टंट एक्सपार्टच्या देखरेखीवर केले गेले आहे. त्याचा याआधी देखील एक स्टंट फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये अक्षय कुमारने बॅंकॉकच्या रस्त्यांवर बाइकवर स्टंट करताना दिसला होता.

View this post on Instagram

Our Khatron Ke Khiladi moment… #sooryavanshi

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कतरिना कैफ ही असणार आहे. हा चित्रपट २७ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची घोषणा ‘सिंबा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.

 

#Doctorsday2019 : म्हणून… साजरा केला जातो ‘डॉक्टर्स डे’

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती

लिंचींग प्रकरणाला जातीय अथवा धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण केले जाऊ नये

 

 

Loading...
You might also like