लंडनच्या रस्त्यावर आईसह फिरताना दिसला खिलाडी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूडचा ऍक्शन सुपरस्टार आणि खिलाडी अक्षय कुमार सध्या खूप खुश आहे. त्याच्या मिशन मंगल या सिनेमाने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. सध्या अक्षय कुमार या सिनेमाचे यश साजरे करण्यासाठी परदेशात असून त्याने आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो आपल्या आईला व्हीलचेयरवर बसवून लंडनमध्ये फिरत आहे. त्याने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे कि, आईबरोबर लंडनमध्ये काही काळ व्यथित करत आहे.

तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही व्यस्त असला आणि कितीही यश मिळवले असले तरी आपल्या आईवडिलांचे वय देखील वाढत चालले असून त्यांच्याबरोबर शक्य तितका जास्त काळ व्यथित करा.

या व्हिडिओत अक्षय आणि त्याच्या आईचा चेहरा दिसून येत नसून त्याच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंद केला जात आहे. तर अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सौम्या गुप्ता नावाच्या एका युजरने लिहिले आहे कि, एकच तर मन आहे मिस्टर खिलाडी, कितीवेळा जिंकणार.

तर दुसऱ्याने लिहिले कि, आईचा लाडका मुलगा. अक्षय कुमार हा आपल्या कुटुंबावर फार प्रेम करत असून वेळ मिळेल तेव्हा तो आपल्या कुटुंबाला घेऊन फिरायला जात असतो.

दरम्यान, याआधी देखील सोशल मीडियावर अनेक फोटो शेयर केले असून यामधून मोठ्या प्रमाणात सामाजिक संदेश देखील देण्याचे काम करत असतो.

आरोग्यविषयक वृत्त –