PM मोदींच्या जन्म दिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला ‘मन बैरागी’ बायोपिकचा लूक !

नवी दिल्ली : वृत्तससंस्था –  आज 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिवस मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अक्षय कुमारने आपल्या बायोपिक चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. ‘मन बैरागी’ असे या बायोपिकचे नाव आहे. हे पोस्टर शेअर करुन खिलाडीने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी सादर केला आहे, तर महावीर जैन या कंपनीने याची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे.

मन बैरागी हा बायोपिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांचे प्रतीक दाखवणारा आहे. तसेच अशा घटना दाखवल्या जाणार आहेत ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयुष्य बदलले. त्यामुळे या चित्रपटाची टॅग लाईन ‘जब मैं मुझसे मिला’ अशी ठेवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींना जन्म दिवसाच्या शुभेच्छा देत अक्षय कुमारने हे पोस्टर शेअर केले आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींचे सर्वसामाऱ्यांना माहित नसलेले अनेक निर्णय आणि घटना या बायोपिकमधून उलगडणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like