‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला ‘खिलाडी’ अक्षयचा मुलगा आरव ! सोशलवर फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव हा कधीच जास्त लाईमलाईटमध्ये नसतो. परंतु सध्या मात्र तो सोशलवर चर्चेत आला आहे. आरवचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे. खास बात अशी की त्याच्यासोबत एक मैत्रीणही दिसत आहे. सध्या हा फोटो जोरदार चर्चेत आहे.

आरवचा जो फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे त्यात त्यानं एका मैत्रिणीला खांद्यावर उचलून घेतलं आहे. फोटोत आरव आणि त्याची मैत्रीण दोघांनीही खास पोज दिली आहे. सध्या हा फोटो खूप चर्चेत असून व्हायरल होत आहे.

आरव इतर स्टार किड्सप्रमाणे जास्त लाईमलाईटमध्ये नसतो. असं असलं तरी चाहत्यांना त्याच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरता आहे. तो कधी सिनेमात दिसतो हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. आता तो कधी पडद्यावर दिसतो हे तर येणारी वेळच सांगेल.

आरवच्या बॉलिवूड डेब्यूवर बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, “तो अजून खूप लहान आहे. अभ्यासावर लक्ष देण्याचं त्याचं वय आहे. त्याला बॉलिवूडमध्ये काम करायचंय की, नाही हे मला माहित नाही. परंतु मी त्याला कसलीही जबरदस्ती करणार नाही.”

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like