चाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे चाहत्यांना ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्टारर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित  सुर्यवंशीची रिलीज डेट बदलून 27 मार्च 2020 करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा सिनेमा आणि सुर्यवंशी यांची पुन्हा टक्कर होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अक्षयचे लाखो चाहेत नाराज झाले. यानंतर आता अक्षयने आपल्या चाहत्यांना आग्रह केला आहे की, आगामी सिनेमा सुर्यवंशीबद्दलच्या सोशलवरील कोणत्याही निगेटीव्ह प्रॅक्टीसमध्ये इन्वॉल्व होऊ नये.

अक्षयने सुर्यवंशीची रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर काही चाहत्यांच्या हे पचनी पडलं नाही. यानंतर युजर्सने ट्विटरवर हॅशटॅग बॉयकॉट सुर्यवंशी अशी सुरुवात केली. हा सिनेमा आधी 2020 मध्ये ईदला रिलीज होणार होता.

अक्षयच्या सुर्यवंशीबद्दल असा निगेटीव्ह ट्रेंड पाहिल्यानंतर अक्षयने ट्विट करत म्हटले की, “गेल्या काही दिवसांपासून हे नोटीस केलं आहे की, माझे काही प्रिय लोक निगेटीव्ह ट्रेंड चालवत आहेत. मी तुमचा राग पाहू शकतो, समजू शकतो. मी फक्त हात जोडून एवढीच विनंती करतो की, अशा ट्रेंड्समध्ये तुम्ही कोणीही सहभागी होऊ नका.”

अक्षयच्या अनेक चाहत्यांनी या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट आणि लाईक केले आहे. एका युजरने तर म्हटले आहे की, आम्हाला सुर्यवंशी ईदलाच पहायचा आहे. आमच्या भावनांशी कृपा करून खेळू नका. सध्या अक्षयचे हे ट्विटही जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे.

https://twitter.com/ImMumin/status/1139538602629586944

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’

You might also like