‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये पुन्हा एकदा बदल ! चाहत्यांची प्रतिक्षा वाढली

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) चा अपकमिंग सिनेमा सूर्यवंशी साठीची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. आता त्याच्या चाहत्यांना सिनेमासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. असं सांगितलं जात आहे की, सूर्यवंशीच्या रिलीज डेट मध्ये बदल करण्यात आला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट पुन्हा एकदा टाळण्यात आली आहे.

सूर्यवंशीच्या रिलीज डेटमध्ये बदल

एका इंग्रजी वृत्तानुसार, सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, रोहित शेट्टीनं पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला आहे. आताही भारतात सिनेमागृह हे 50 ऑक्युपसीवर खुले केले जात आहेत. सिनेमागृह 100 टक्के भरण्यासाठी फिल्ममेकर्स प्रतिक्षा करत आहेत. मेकर्सचं असं म्हणणं आहे की, सिनेमागृह 100 टक्के भरतील तेव्हाच सिनेमा रिलीज केला जाईल.

या महिन्यात रिलीज होणार मल्टीस्टारर सिनेमा सूर्यवंशी

सूर्यवंशी हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. हा सिनेमा आता जून किंवा जुलै 2021 मध्ये रिलीज केला जाईल. रोहित जून किंवा जुलैची रिलीज डेट पहात आहे. सिनेमाला जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावेत, याशिवाय त्या दिवशी इतर कोणता सिनेमा रिलीज होऊ नये जेणेकरून सिनेमाला जास्त फायदा मिळेल अशी रोहितची इच्छा आहे.

या कारणामुळं केला तारखेत बदल

बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा 2021 च्या ईद निमित्तानं रिलीज केला जाणार आहे. रोहित शेट्टीची इच्छा नाही की, अक्षयचा सिनेमा आणि सलमानचा सिनेमा यांनी क्लॅश करावं. हा सिनेमा क्लॅश झालं तर निर्मात्यांचं नुकसान होऊ शकतं.

अनेकदा टाळलीय रिलीज डेट

सूर्यवंशी सिनेमाच्या रिलीजमध्ये काही नाही काही बाधा येताना दिसतच आहे. सतत याची रिलीज डेट पुढं ढकलली जात आहे. हा सिनेमा गेल्या वर्षीच रिलीज केला जाणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं याची रिलीज डेट टाळण्यात आली. आता पुन्हा एकदा रिलीज डेटमध्ये बदल केल्याचं समोर येत आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे राम सेतु हाही सिनेमा आहे.