बॉलिवूड मध्ये कोरोनाचा कहर ! ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा रिपोर्ट आला Covid-19 पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना केलं टेस्ट करण्याचं आवाहन

मुंबई : बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. 2020 मध्ये लावलेला कोरोना लॉकडाऊन हटवल्यानंतर अक्षय सातत्याने शुटींग करत आहे. तो आपले चित्रपट वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. मात्र, आता त्याला कोरोना व्हायरसने गाठले आहे.

अक्षय कुमारने सांगितले की, त्यास कोरोना झाला आहे. याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करत अक्षयने म्हटले की, तो होम क्वारंटाइनमध्ये आहे आणि आवश्यक वैद्यकीय मदत घेत आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी सर्वांना सांगू इच्छितो की, आज सकाळी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

 

 

 

 

त्याने पुढे लिहिले, सर्व प्रोटोकॉल्स लक्षात घेऊन मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी होम क्वारंटाइनमध्ये आहे आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपल्या टेस्ट कराव्यात आणि लक्ष देण्याची विनंती करतो. लवकरच अ‍ॅक्शनमध्ये परत येईन.

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर वेगाने पसरत आहे. एका पाठोपाठ एक अनेक स्टार्सला कोरोनाची लागण झाली आहे. सीरियल अनुपमाची अभिनेत्री रुपाली गांगुली आणि प्रमुख अभिनेता सुधांशु पांडे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय कार्तिक आर्यन, आमिर खान, परेश रावल यांच्यासह इतर सुद्धा व्हायरसचा सामना करत आहेत.