ATF चेअरमन MS बिट्टा यांच्या बायोपिकमध्ये लिड रोल करणार ‘खिलाडी’ अक्षय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डिसेंबर 2019 मध्ये गुड न्यूज सारखा हिट सिनेमा दिल्यानंतर अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा सूर्यवंशीसाठी तयार आहे 2021 पर्यंत अक्षयचे एकापाठोपाठ एक सिनेमे रांगेत आहेत असं दिसत आहे. अशात त्याच्या आणखी एका सिनेमाचं नाव समोर आलं आहे. अशी चर्चा आहे की, अक्षय कुमार ऑल इंडिया अँटी टेररीस्ट फ्रंट (AIATF) चे चेअरमन मनिंदर सिंह बिट्टा (एमएस बिट्टा) यांच्यावर बनणाऱ्या बायोपिकमध्ये बिट्टा यांचा रोल साकारणार आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, रिलायन्स एंटरटेंमेंटनं दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील एक घोषणा म्हणजे लवकरच एम एस बिट्टा यांचं बायोपिक येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमासाठी राईट्सही खरेदी केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बिट्टांच्या बायोपिकबद्दल बातचित सुरू होती तेव्हा अक्षय कुमार त्यांची फर्स्ट चॉईस होता. अक्षय कुमार याच प्रकारच्या देशभक्तीपर सिनेमासाठी ओळखला जातो. त्यामुळे जेव्हा बिट्टांच्या सिनेमाची चर्चा सुरू झाली तेव्हा निर्मात्यांनी पहिल्यांदा अक्षय कुमारलाच निवडलं.

स्क्रिप्ट वाचल्यानंतर ‘अशी’ होती अक्षयची रिअ‍ॅक्शन

अक्षय कुमारचं या सिनेमाबद्दल काय मत आहे याबाबतही सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारनंही या सिनेमसाठी रस दाखवला आहे. त्यानं एम एस बिट्टा यांच्याबद्दल वाचलं असून त्याला स्क्रिप्ट आवडली आहे. अद्याप अक्षयनं या सिनेमासाठी होकार दिला नसला तरी प्रक्रिया मात्र सुरू आहे. टीमला मोठ्या स्केलवर हा सिनेमा बनवायचा आहे. त्यांना बिट्टांच्या आयुष्यातील अनेक फेज दाखवायच्या आहेत. अक्षय आणि बिट्टा यांच्या मीटींगचे प्लॅनही सुरू आहेत.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कॅटरीना कैफ लिड रोलमध्ये आहे. याशिवाय अक्षय लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बेल बॉटम आणि बच्चन पांडे अशा अनेक सिनेमात काम करताना दिसणार आहे.

You might also like