अक्षय कुमार भाजपाकडून लढणार लोकसभा निवडणूक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवुड खिलाडी अक्षय कुमार आता सिनेसृष्टीनंतर राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. आजच अक्षय कुमारने एक ट्विट केले आहे. त्याच्या ट्विटवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, तो राजकाणात उतरणार आहे. शिवाय त्याला भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अमृतसर येथून अक्षय कुमार निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या ट्विटमध्ये अक्षय कुमार म्हणतो की, “एका नवीन आणि अनोळखी क्षेत्रात पाऊल टाकत आहे. असे काही करत आहे जे याआधी कधीच केले नाही. हे करण्यासाठी मी फारच उत्सुक आणि सोबतच चिंतीत आहे. आणखी अपडेट घेण्यासाठी संपर्कात रहा.” असे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अक्षयच्या ट्विटवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, तो लोकसभा निवडणू लढवणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

याआधीही अक्षय कुमार भाजपाच्या तिकीटावर अमृतसर येथून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत वृत्त समोर आलं होतं. यावर अक्षय कुमार याने प्रतिक्रिया दिली होती. मी माझ्या खासगी आयुष्यात खूप खुश असून मी कोणतीही निवडणूक लढवत नाही असे अक्षय कुमारने म्हटले होते. यानंतर आता पुन्हा तो निवडणूक लढवण्याबाबत वृत्त समोर आलं आहे.

दरम्यान अक्षय कुमार याने ट्विट करताना तो ज्या नवीन क्षेत्रात पाऊल टाकत आहे ते क्षेत्र म्हणजे राजकराणच आहे असे स्पष्ट म्हटलेले नाही.