‘खिलाडी’ अक्षय अयोध्येत देणार ‘जय श्री राम’ चा नारा ! ‘या’ दिवशी सुरू करणार ‘राम सेतू’चं शूटिंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या राम सेतू या बहुप्रतीक्षित आगामी सिनेमाचं 80 टक्के शूटिंग हे मुंबईत होणार आहे. दरम्यान, गुरुवारी दि. 18 मार्च रोजी अयोध्येत राम सेतू या बहुचर्चित सिनेमाचा मुहूर्त होणार आहे.

अक्षय कुमार याबाबत बोलताना म्हणाला, हा सिनेमा कालच्या, आजच्या आणि उद्याच्या अशा तीन पिढ्यांध्ये सेतू म्हणून काम करेल. सिनेमात विश्वास, विज्ञान आणि ऐतिहासिक वारसा तसंच भारतीयांच्या श्रद्धेची कथा दाखवण्यात येणार आहे असंही तो म्हणाला.

सिनेमात अक्षय कुमार भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. राम आणि रामायण यांच्या आदर्शांवर आधारित हा सिनेमा असणार आहे. लवकरच अक्षय सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

राम सेतू या सिनेमातील पहिल्या शॉटचा मुहूर्त हा गुरुवारी दि. 18 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होणार आहे. अभिषेक शर्मा सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. अरुण भाटीया आणि विक्रम मल्होत्रा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे राम सेतू हाही सिनेमा आहे.