‘भल्लालदेव’ आयुष्यभरासाठी लॉकडाऊनमध्ये गेलास, अक्षयनं राणाला दिल्या हटके शुभेच्छा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकला आहे. राणा व मिहीका बजाज यांचा विवाहसोळा पार पडला. या निमित्ताने चाहत्यांनी राणा व मिहीकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने देखील अनोख्या अंदाजात राणाला शुभेच्छा दिल्या. आयुष्यभरासाठी लॉकडाउनमध्ये जाण्याची ही योग्य पद्धत आहे. राणा तुला लग्नाच्या भरपूर शुभेच्छा. जगातील सर्व आनंद तुम्हाला मिळो. अशा आशयाचे ट्विट करुन अक्षयने शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय व्यतिरिक्त बिपाशा बसु, काजल अग्रवाल, श्रुति हसन, अमाला पॉल, श्रिया शरण, राम चरण अशा अनेक सेलिब्रटींनी राणावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सेलिब्रिटींच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. शिवाय सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती. मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. तिचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.