२०१९ मध्ये अक्षय घेऊन येणार आहे ‘गुड न्यूज’

मुंबई : वृत्तसंस्था – अक्षय कुमार नेहमी आपल्या चित्रपटात विविध भूमिका साकारत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याचा रजनीकांत यांच्यासोबत केलेला चित्रपट ‘2.0’ चित्रपट सुपरहिट ठरला. आता २०१९ हे वर्षही त्याच्यासाठी खास ठरणार आहे कारण यावर्षी अक्षयचे चार सिनेमा निश्चित प्रदर्शित होणार आहे. लवकरच त्याचा केसरी हा चित्रपट २१ मार्चला रिलीज होणार असून अन्य चित्रपट ही लवकर रिलीज होणार आहे. या चित्रपटा प्रमाणे अक्षयचा ‘गुड न्यूज’ चित्रपटाची रिलीज डेट समोर झाली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी आपल्या सोशल मीडियावरुन दिली आहे.

‘गुड न्यूज’ हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत करिना कपूरची जोडी पाहायला मिळेल. तसेच  दिलजीत दोसन्ज आणि कियारा अडवाणी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करीत आहेत. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरू आहे. यापूर्वी सेटवरचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. अक्षय आणि करिना यापूर्वी तलाश, बेवफा, एतराज, टशन यांसारख्या चित्रपटात एकत्र दिसले होते. आता पुन्हा ही जोडी एकत्र दिसल्यावर अक्षय, करिनाच्या चाहत्यांसाठी ही चांगलीच ‘गुड न्यूज’ असणार आहे.