‘खिलाडी’ अक्षयचा नाशिक दौरा वादाच्या भोवर्‍यात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जुलै महिन्याच्या सुरुवातीला नाशिक दौऱ्यावर आलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कोणी दिली. तसेच ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांनी संरक्षण कस दिलं ? असे प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील या भागात अक्षय कुमारचा दौरा होता. येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरच लँडिंग होत. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागत देखील करण्यात आलं.

तसेच अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयला शहर पोलिसांकडून सुरक्षेसाठी एस्कॉर्टही पुरवण्यात आला. परंतु, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवेश कसा केला, त्याशिवाय एस्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्यास भुजबळ यांनी सांगितलं आहे. तसेच लॉकडाऊन मध्ये सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट बंद असताना अक्षयसाठी तारांकित रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले, तेथे अक्षयचा पाहुणचार कसा झाला ? असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांच्याकडून उपस्थित केला गेला. त्यामुळे अक्षय कुमारच्या संपूर्ण दौऱ्याचे चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

नाशिक शहर आणि जिल्ह्यात एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ४८६४ इतकी झाली आहे. त्या अनुषंगाने छगन भुजबळ यांनी शनिवारी कोव्हिड-१९ सेंटरची पाहणी केली. ठक्कर डोम मध्ये ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली असून, निमा संस्थेमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या सुविधा कमी पडतील त्या राज्य सरकारकडून उपलब्ध केल्या जातील अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like