अक्षय कुमारच्या ‘या’ ड्रेससाठी ५.२५ कोटींची बोली !

चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या वेशभूषा या नेहमीच चर्चेत असतात. त्या कपड्यांचा लिलाव होत असतो. या पूर्वी देखील बॉलिवूडमधील काही चित्रपटांमधील व्यक्तिरेखांच्या वेशभूषांचा लिलाव झाला आहे. बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘रुस्तम’ चित्रपटात एका नौदल अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील गणवेशाचा लिलाव अक्षय कुमार करत आहे.

अक्षय कुमारने आपल्या वेशभूषेचा लिलाव जाहीर केला असून त्याला आतापर्यंत ५.२५ कोटींची बोली लावण्यात आली आहे. हा लिलाव २६ मेपर्यंत सुरू राहणार असून ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. या लिलावातील रक्कम प्राण्यांसाठी खर्च करणार असल्याचे अक्षयने पुन्हा एकदा सांगितले. यातून त्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा दिसून येते. ही माहिती अक्षय कुमारने एका ट्विटद्वारे दिली. हा गणवेश त्याने ‘रुस्तम’मध्ये परिधान केला होता.