‘राणा’दामध्ये नाही तर ‘यात’ रंगला आहे अंजलीबाईंचा जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुझ्यात जीव रंगला ही प्रसिद्ध मालिका सर्वांनाच माहिती आहे. यातील पाठक बाई म्हणजेच अंजली आणि राणादा यांची जोडी तर सर्वांनाच आवडते. पाठक बाईंची भूमिका साकारणारी अक्षया देवधर या मालिकेमुळे घराघरात पाहोचली. या मालिकेमुळे पाठक बाई प्रकाशझोतात आल्या. परंतु या पाठक बाई कोणाच्या फॅन आहेत हे तुम्हाला माहीत आहे का. अक्षया देवधर गेम ऑफ थ्रोन्सी फॅन आहे.

सध्या अक्षयाचा जीव राणामध्ये नाही तर गेम ऑफ थ्रोन्समध्ये रंगला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या अक्षया तिच्या शुटींगच्या बिजी शेड्युलमधून वेळ काढथ गेम ऑफ थ्रोन्सचे एपिसोड्स पहात आहे. अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिला गेम ऑफ थ्रोन्सचे वेड लागले आहे.

अक्षयाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर सध्या तिची मालिका तुझ्यात जीव रंगला ने नकुताच 750 भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतून अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी तर दिसतेच परंतु कुस्तीचे महत्त्वही दिसून येते. सध्या ही मालिका खूपच प्रकाशझोतात असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना यातील सर्व व्यक्तिरेखा तितक्याच आवडतात जिकत्या अंजली आणि राणाच्या आवडतात.