काश्मीर मुद्दावरून अलकायदाचा प्रमुख जवाहिरीची सरकार आणि लष्करी सैन्याला ‘ही’ धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओसामा बिन लादेन याची दहशतवादी संघटना अल कायदा हिचा प्रमुख अल जवाहिरी याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. काश्मीर मुद्द्यावरून त्याने भारताला धमकी देताना एक संदेश जारी केला आहे. ‘कश्मीर को मत भूलना’ या नावाने त्याने हा संदेश देत भारताला इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना जेहादी-मुजाहिदीन म्हणत त्याने काश्मीरमध्ये लढत असलेल्या मुजाहिदींना पाकिस्तानच्या ताब्यातून सोडवले पाहिजे असेदेखील म्हटले आहे. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यात भारतीय सुरक्षा दलांबरोबर युद्ध छेडण्याचे आवाहन देखील त्याने केले आहे.

१४ मिनिटांच्या या संदेशात जवाहिरी याने म्हटले आहे कि, माझ्या मते मुजाहिदीनने काश्मीरमध्ये भारतीय सेना आणि सरकारवर निशाणा साधायला हवा. भारतावर मोठा हल्ला करायला हवा. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात फरक पडेल. त्याचबरोबर भारतीयांना सैनिकांची संख्या कमी असल्याने देखील फार कष्ट करावे लागतील. ज्या वेळी जवाहीर हा संदेश देत होता त्यावेळी जाकिर मूसाचा फोटो स्क्रीनवर झळकला. मात्र त्याने त्याच्याविषयी काहीही उल्लेख केला नाही. यावर्षी भारतीय सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात तो मारला गेला होता.

कोण आहे अल जवाहिरी ?
‘वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार १९८८ मध्ये अल जवाहिरी याने ओसामा बिन लादेन याला अलकायदाच्या स्थापनेत मदत केली होती. अल जवाहिरी हा अलकायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशहतवादी कारवायांमध्ये त्याने नेतृत्व केले आहे. लादेनच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे आता अल कायदाचे प्रमुखपद असून तो सर्व अल कायदाला सध्या कंट्रोल करत आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात