मोठं यश, ‘अल-कायदा’चा खतरनाक आतंकवादी भारताच्या ताब्यात, अमेरिकेनं केलं सुपुर्द

नवी दिल्ली : वृत्तसस्था –  अमेरिकेने अल कायदाचा खतरनाक दहशतवादी मोहम्मद इब्राहिम जुबैर याला भारताच्या स्वाधीन केले आहे. 19 मे रोजी त्याला भारतात आणण्यात आले आणि पंजाबाच्या अमृतसरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. हैदराबादचा रहिवासी असलेला झुबैर हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी फंड पुरवत होता. दहशतवादी कारवायामध्ये त्याला अमेरिकेच्या कोर्टात दोषी ठरवण्यात आले.

इब्राहिम जबैर याला 2011 मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. तो तेलंगणाचा असून तो व्यावसायाने अभियंता आहे. अमेरिकन दहशतवादी कारवायांमध्ये तो दोषी आढळला होता. अमेरिकेतील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने त्याला भारताच्या ताब्यात दिले आहे. त्याला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचा भाऊ याह्या मोहम्मद याला 27 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इब्राहिम झुबैर याला बुधवारी मोठ्या बंदोबस्तात भारतात आणण्यात आले. भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता का, याची चौकशी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

जुबैरने 2001 मझ्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमधून पदवी संपादन केली आणि पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. त्याचा भाऊ याह्या फारूक मोहम्मद अमेरिकेत रहात होता. उर्बाना येथील इलिनॉय विद्यापिठात त्याने प्रेवेश घेतला होता. 2005 नंतर तो ओहायोला शिप्ट झाला. भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, झुबैर हा अलकायदाचा नेता अन्वर अल आवलाकी याचे व्हिडिओ पाहून दहशतवादी बनला. जेव्हा त्याचा भाऊ दुबईला शिप्ट झाला तेव्हा त्याने मोहम्मद जुबैरचा अमेरिकन पत्ता बँक व्यवहारासाठी वापरला.