आळंदी : दारु पिण्याच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन मृतदेह टाकला इंद्रायणी नदीत

पिंपरी : दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तिघांनी तरुणाला मारहाण करुन त्याचा खुन killed केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बारदानाच्या पोत्यात घालून इंद्रायणी नदीच्या पात्रात टाकून दिले होते. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी Alandi Police खुनाचा killed गुन्हा दाखल करुन तिघांना ताब्यात घेतले आहे.

किसन गेणभाऊ पारधी (वय ३०, रा. ठकारवस्ती, चर्‍होली खुर्द, ता. खेड) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बापू मारोती जोंधळे यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन विठ्ठल ठाकर,

अनिल सोमा ठाकर (दोघे रा. ठाकरवस्ती, चर्‍होली खुर्द) आणि सचिन लक्ष्मण जाधव (रा. पिंपळगाव, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आळंदी जवळील मरकळ गावातील बागवान वस्ती जवळील फिरंगाई देवी मंदिराजवळ इंद्रायणी

नदीच्या पात्रात १ जून रोजी दुपारी १ वाजता पोलिसांना एक पोत्यात मृतदेह आढळून आला होता.

घटनास्थळावरील परिस्थिती व इन्क्वेस्ट पंचनाम्यावरुन हा खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन किसन पारधी याला आरोपींनी संगनमताने दारु पिण्याच्या कारणावरुन मारहाण करुन त्याचा खुन केला.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचा संशय आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे अधिक तपास करीत आहेत.

Also Read This : 

 

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय

 

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

 

COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

 

मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या

 

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

डीएनए द्वारे मृतांची ओळख पटविणार ! आयएसओ 9001- 2015 मानांकित कंपनीत 18 जणांचा मृत्यु

 

बडीशेपपासून बनवा चेहर्‍यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’

 

नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी