Alandi News | माउलींच्या सोहळ्यावर कोरोनाचे सावट? आळंदीच्या नगराध्यक्षांसह 37 वारकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

आळंदी न्यूज (Alandi News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) चलपादुका आज प्रस्थान ठेवणार आहेत. मात्र पूर्वसंध्येला निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Test) घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल (Test Report) आला असून यामध्ये आळंदीच्या (Alandi) नगराध्यक्षांसह (Mayor) ३७ वारकऱ्यांना कोरोना संसर्ग (Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या (Corona) संकटामुळे यंदाही पायीवारी रद्द करण्यात आली. मात्र काही निमंत्रित वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) चलपादुका पंढरपूरला घेऊन जाण्यास परवानगी शासनाने दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) चलपादुका प्रस्थान करणार होत्या. दरम्यान गुरुवारी आळंदी (Alandi) देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या (Alandi Rural Hospital) माध्यमातून निमंत्रित वारकऱ्यांची कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यात आली त्यामध्ये आळंदीच्या आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ वारकऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मंदिरातील कर्मचारीही आहे. त्यामुळे या लोकांच्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून कोरोनचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे.

Web Titel :- Alandi News | 37 warkari corona positive alandi mayor sant dnyaneshwar maharaj palkhi sohala start

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू