Alandi News | ‘इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला NDRF च्या पथकाने वाचवले’

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Alandi News | आळंदी येथील इंद्रायणी नदीमध्ये (Indrayani river) स्नान करत (Alandi News) असताना पाय घसरुन पडल्याने वाहून जाणा-या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवण्यात एनडीआरएफ पथकाला (NDRF squad) यश आलं आहे. बीड जिल्ह्यातील इंजेगाव येथील रघुनाथ कराडे (Raghunath Karade) यांना एनडीआरएफ पथकाने वाचवले आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.

 

जेष्ठ वारकरी रघुनाथ कराडे (Raghunath Karade) इंद्रायणी घाटावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी ते पाय घसरून पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते वाहत जात होते. ही बाब एनडीआरएफ पथकाच्या (NDRF squad) निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कराडे यांना पाण्यातून बाहेर काढले आहे. प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलिसांनी (Alandi Police) कराडे यांना कुटूंबीयांच्या स्वाधीन केलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Alandi News)

 

तीर्थक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अनेक लाखो भाविक आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ वारकऱ्याचा जीव वाचवल्याने एनडीआरएफ पथकाचे (NDRF squad) सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

Web Title : Alandi News | NDRF Squad rescued senior warakari who was carried indrayani alandi of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा