सोन साखळी चोरट्यास अलंकार पोलिसांकडून अटक, ४ गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोन साखळी चोरीचे गुन्हे करणारा अलंकार पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. संजय श्रीधर हुले असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३ तर डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.

पोलिस कर्मचारी प्रफुल्ल चव्हाण आणि राजेंद्र लांडगे यांनी साखळी चोर संजय हुलेला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून ९६ ग्रॅम वजनाचे ३ लाख ७ हजार २०० किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहाय्यक आयुक्त पी. डी. राठोड, अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्पना जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलिस नाईक बाबुलाल तांदळे, प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण राऊत, संदिप धनवटे, योगेश बडगे, ओंकार शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like