अजबच… ‘या’ जिल्ह्यातील अख्खं गाव गेलं चोरीला

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन

कुणाचे पैसे, वस्तू, कपडे, दागिने चोरीला जातात. तर चित्रपटामध्ये विहीर चोरीला गेल्याचे पाहिले असेल. मात्र, रायगड जिल्ह्यातील एक अख्ख गाव चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे गाव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अजब-गजब तक्रारीने पोलीस देखील चक्रावले आहेत. माणगाव तालुक्यातील महाराणा प्रतापनगरात राहणाऱ्या नागरिकांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत गाव चोरीला गेल्याची तक्रार केली. एवढेच नाही तर आमचे गाव आम्हाला शोधून द्या अशी विनंती देखील त्यांनी पोलिसांना केली आहे. गाव मिळाले तर आमची शेती सापडेल असे सांगत गाव शोधण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’965c198b-c4ab-11e8-9168-2f67ac50c712′]

माणगावातील महाराणा प्रतापनगरात बेलदार समाजाची अनेक कुटुंबे राहतात. भटकंती करत येथे स्थायिक झालेल्या बेलदार समाजातील कुटुंबांनी  येथे सरकारी जमिनीवर त्यांनी तात्पुरता निवारा उभारला आहे, परंतु या जमिनी ताब्यात घेऊन या कुटुंबांना तेथून हुसकावण्यात येणार आहे. त्यामुळे या रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. कुटुंबकबिल्यासह त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचे गाव चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.

[amazon_link asins=’B074RM4YZC,B07B8QQ4CB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc30650f-c4ab-11e8-9010-4b10993a23b2′]

भटकंती थांबावी ही आमच्या समाजाची इच्छा आहे. आम्हाला स्वतःची घरे बांधायची आहेत, घर बांधण्यासाठी जागा घ्यायची आहे, पण आम्हाला शेतकरी दाखला मिळत नाही. आम्ही जागा घेऊ नये आणि घर बांधू नये हीच सरकारची इच्छा आहे काय? असा संतप्त सवाल बेलदार समाजाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. आमचे हरवलेले गाव सापडले की त्या गावात आमची शेतीही सापडेल. मग आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला मिळेल. मग आमचा समाज कुठेही जागा घेऊन हवं तसं घर बांधेल. आमच्यावर अतिक्रमण करण्याची वेळ येणार नाही, अशी व्यथाही त्यांनी यावेळी मांडली.

एकटा असायचो तेव्हा मी रडायचो : शरद पवार

बेलदार समाज हा भटका समाज असून दगड फोडणे, बांधकामावर मोलमजुरी करणे हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे अनेक पिढय़ांचे आयुष्य भटकण्यातच गेले. जिथे व्यवसाय तिथेच बिऱ्हाड. यामुळे या भटकंतीत बेलदार समाजाचे मूळ गावच हरवले आहे. मुलांचे शिक्षण, जातीचा दाखला द्यावा लागतो. त्या दाखल्यासाठीही 1961 चा पुरावा लागतो. जागा घेऊन घर बांधायचे असेल तर शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागतो.

त्यामुळे बेलदार समाज ना घर बांधू शकत ना शिक्षण घेऊ शकत. सरकार ज्याअर्थी आमच्याकडून मूळ गावचा पुरावा मागत आहे त्याअर्थी महाराष्ट्रात कुठेतरी आमचे मूळ गाव आहे आणि तेच हरवले आहे. म्हणून पोलिसांनी आमचे चोरीला गेलेले गाव शोधून द्यावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी बेलदार समाजाच्या रोहिदास मोहिते, कुमुदिनी चव्हाण, रामू पवार, भारत पवार, सुनील पवार, हनुमान मोहिते, शशिकांत मोहिते, रोहिदास चव्हाण, संताजी पवार यांनी माणगाव पोलिसांकडे केली आहे.
जाहिरात.