तलावाच्या ‘खोदाई’ कामादरम्यान भांड्यावर धडकला ‘फावडा’, निघाला ‘खिलजी’चा खजाना, उडाली भंबेरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बाराबंकी मध्ये दरियाबादच्या कांटी रोहिलानगर येथील तलावाच्या खोदकामादरम्यान सल्तनत काळातील नाणी बाहेर आली आहेत. तलावाच्या खोदकामाच्या वेळी एक मातीचे भांडे मिळाले त्या भांड्यामध्ये जवळपास १२५ नाणी निघाली आहेत. लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून या नाण्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

येथे राहणारे मनोज यादव हे आपल्या घरासमोरील तलावाचे खोदकाम करत होते. त्या वेळी तलावाच्या एका लहान मातीच्या भांड्याशी फावडा धडकला. फावड्याच्या धडकण्याने त्या मातीच्या भांड्यास बाहेर काढण्यात आले. या मातीच्या भांड्यात उर्दू-फारसी भाषेत लिहिलेली पुरातन काळातील १२५ नाणी निघाली. ही नाणी जंग लागलेल्या अवस्थेत होती. ही नाणी तांब्याची असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना कळवण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचली. मनोज यादवने ही नाणी पोलिसांच्या हवाली केली. सांगितले जात आहे की ही नाणी सल्तनतकालीन अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील आहेत. या संदर्भात पोलिसांमार्फत फोनवर सांगण्यात आले की पुरातत्व विभागाकडे ही नाणी रिपोर्ट लावून पाठविण्यात आली आहेत.

या बद्दल मनोज यांनी सांगितले की, आम्ही तलावाचे खोदकाम करत होतो, तेव्हा आम्हाला एक मातीचे भांडे मिळाले. त्या भांड्यास उघडले तर त्यात १२५ नाणी होती. आम्ही अगोदर यास तलावात फेकून दिले. नंतर पोलीस आल्यावर आम्ही त्यास पोलिसांच्या हवाली केले. जवळपास १२५ नाणी होती ज्यावर मोहर देखील लावली होती. आम्ही जेव्हा युट्युब वर सर्च केले तेव्हा आम्हाला निदर्शनास आले की ही नाणी सल्तनत काळातील आहेत. त्या काळात अल्लाउद्दीन खिलजीची सल्तनत होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/