24 वर्षापासुन पोलिसांच्या ‘निगराणी’खाली 50 हजार लिटर दारू, न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय, आता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेकायदेशीर दारू नष्ट केल्याची बरीच प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु असे एक प्रकरण समोर आले आहे, जिथे २४ वर्षांपूर्वी पकडण्यात आलेली ५० हजार लिटरच्या देशी व इंग्रजी दारूवर कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर कारवाई करण्यात आली.

हरियाणामध्ये बन्सीलाल यांचे सरकार होते. १९९६ ते १९९८ या काळात रोहतकमध्ये दारू बंदीच्या वेळी पोलिसांनी अवैध दारू पकडली. कोर्टाच्या आदेशानुसार आता रोहतक पोलिसांनी अवैध दारू नष्ट केली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात सुमारे ६०० खटले दाखल करण्यात आले होते आणि २४ वर्षांपासून पोलिस या दारूचे पहारेकरी होते. कोर्टाकडून ही दारू नष्ट करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तहसीलदारांच्या देखरेखीखाली ५० हजार लिटर दारू जेसीबी मशीन बसवून नष्ट करण्यात आली.

रोहतक मुख्यालयात डीएसपी गोरखपाल राणा म्हणाले की, बन्सीलाल यांच्या सरकारच्या बंदी दरम्यान ही अवैध दारू पकडण्यात होती. १९९६ ते १९९८ पासून तो दारूसाठा रेडक्रॉस भवनात पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला होता. जो आता नष्ट करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/