17 गुन्ह्यात पकडलेली 2 लाखांची दारु नष्ट

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या दीड ते दोन लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या आज पोलिसांनी अखेरचा निरोप देत मोठ्या खड्ड्यात बाटल्यांचा भुगा करून त्या पुरून टाकल्या आहेत.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, की गेल्या वर्षभरात सतरा ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अवैध पद्धतीने दारूविक्री करणाऱ्यांकडून देशी दारू, विदेशी दारू, बनावटी दारू आणि बियरच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या होत्या. जवळपास आठ-दहा महिन्यांपासून संपूर्ण पकडलेला माल बीड शहर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूस असलेल्या एका रूममध्ये ठेवण्यात आला होता. परंतु आज उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे, पोहेकाॅ तांदळे, पोना सानप, पोना जोगदंड, सानप, ए एस आय गांधले, यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात आज जेसीबी ने खड्डा करुण या बाटल्यांची विल्हेवाट लावली.