गावठी दारूभट्टी बनवणारा कारखाना यवत पोलिसांकडून उध्वस्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनविणारा छोटा कारखाना यवत पोलिसांनी उध्वस्त केला आहे. हि कारवाई यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एन.देवकर, पोलीस कर्मचारी विनोद रासकर, विशाल गजरे, प्रशांत कर्नलवल यांनी केली.

या प्रकरणी अजित शिवाजी काळे  पो.शि.ब. नं. २३३३ यवत पोलीस स्टेशन यांनी आरोपी महेंद्र सोपान थोरात वय ३० वर्षे रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे पिंपळगाव गावचे हद्दीत आरोपी हा आपल्या घराजवळ दारू बनविण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यावेळी पोलिसांनी धाड घालून खालील प्रमाणे माल हस्तगत केला.

१) ३६०००/- एकूण १२ निळे रंगाचे २०० लिटर मापाचे बॅरल प्रत्येकी १०००रूपये कि.चा प्रत्येक बॅरलमध्ये प्रत्येकी २००लिटर गावठी हातभट्टीची तयार करण्याचे कच्चे पिवळसर रसायन एकूण २४०० लिटर रसायन(कच्चे रसायन १०रू.लिटर प्रमाणे )

२) ४०००/- एक ३००लिटर मापाचे पत्र्याचा बॅरल १०००रू कि.त्यामध्ये ३००लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे पिवळसर रसायन एकूण ३००लिटर ( कच्चे रसायन १०रू लिटर प्रमाणे ) रसायन

३) २०००/- एक इलेक्ट्रिक मोटार

४) १८५०/- एक ३५ लिटर मापाचे काळे रंगाचे १००रू कि.चे कॅन्ड त्यामध्ये गावठी हातभट्टीची ३५ लिटर तयार दारू ( ५० रूपये लिटर प्रमाणे )

५) १०००/- एक इलेक्ट्रिक भाता

६) २००/- एक अॅल्युमिनअचा चाटू

७) १०००/- एक मन लाकूड

असा माल हस्तगत करून बनविलेले रसायन हे नष्ट केले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.