Corona Vaccine : लस घेतल्यानंतर चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथ होऊ शकतो ‘कोरोना’

नवी दिल्ली : कोरोना व्हॅक्सीनबाबत दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. शास्त्रज्ञांनुसार, दारू पिण्याची सवय कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात येणार्‍या व्हॅक्सीनचा परिणाम नष्ट करू शकते. शास्त्रज्ञांनी सल्ला दिला आहे की, व्हॅक्सीनच्या दोन महिन्यापर्यंत दारूपासून दूर राहिले पाहिजे. रशियाचे उप पंतप्रधान ततियाना गोलिकोव्हा यांनी सुद्धा अशा प्रकारचा सल्ला जारी केला आहे. रशियामध्ये सध्या आमजनतेला कोरोनापासून वाचण्यासाठी स्पूतनिक-व्ही व्हॅक्सीनचा डोस दिला जात आहे.

ततियाना गोलिकोव्हा यांच्यानुसार, लोकांना सल्ला दिला जात आहे की, जर त्यांना कोरोनापासून वाचायचे असेल, आणि व्हॅक्सीनचा परिणाम पहायचा असेल तर त्यांनी दारूपासून काही दिवस दूरू राहावे. या सल्ल्याचा अर्थ लोकांची प्रतिकारशक्ती मजबूत बनवणे आहे. रशियाच्या लोकांना स्पूतनिक-व्ही व्हॅक्सीन देण्याचे काम सुरू आहे. लसीकरणाच्या दोन महिन्यानंतर व्हॅक्सीन आपले काम करण्यास सुरूवात करेल. अशावेळी व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सरकारकडून सल्ला दिला जात आहे की, व्हॅक्सीन घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीला खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. व्हॅक्सीन घेण्याचा हा अर्थ अजिबात नाही की, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करावा. व्हॅक्सीन दिल्यानंतर सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, सोबतच सॅनिटायझर आणि मास्क अनिवार्य आहे.

व्हॅक्सीनचा परिणाम कमी करते दारू
रशियन आरोग्य मंत्रालयाच्या इन्स्टीट्यूट एपिडेमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे प्रमुख अलेक्झांडर गिन्ट्सबर्ग यांच्यानुसार, दारू आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी करते. अशावेळी जर व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा दारूचे सेवन केले तर लसीचा अपेक्षित परिणाम होणार नाही. इतके की अनेकदा दारू पूर्णपणे व्हॅकसीनचा परिणाम नष्ट करते.