सावधान ! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या कशी घ्याल खबरदारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – डिजिटल व्यवहार कोरोना संकट काळात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणुक आणि डिजिटल हेरगिरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाप्रकारच्या फसवणूकीने मोठे नुकसान होते. कारण युजर्सची मोबाईल फोन, लॅपटॉप संगणकात महत्वाची वैयक्तिक माहिती किंवा पेमेंटबाबतची महाती असते. सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट अमित मल्होत्रा यांनी धक्कादायक दावा केला आहे की, टिकटॉक, पबजी आणि इतर चिनी अ‍ॅप्स वापरुन 20 लाखाहून अधिक डेटाबेसची चोरी झाली आहे.

अशी केली जाते डिजिटल हेरगिरी
तीन प्रकारे डेटाची डिजिटल हेरगिरी होते. इंटरनेटद्वारे पब्लिक डोमेनमधील डेटा, मोबाईल व संगणकातील विविध अ‍ॅप्समधील डेटा आणि तिसरा म्हणजे बड्या कंपन्यांचा डेटाबेस चोरण्यासाठी हेरगिरी होते. मोबाईलमधील अ‍ॅपमध्ये असलेला डेटा थर्ड पार्टीपर्यंत जातो.

बचावासाठी हे लक्षात ठेवा
1 मेल आयडीवर फ्री कोव्हिड-19 टेस्टिंगचा मेल असेल तर डेटा हॅक होऊ शकतो. असे मेल उघडू नका.
2 मोबाइलवर कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्याधी त्या अ‍ॅप करता आवश्यक नसणार्‍या परमिशन रद्द करा.
3 दोन मोबाइल आयडी वापरू शकता.
4 बँक कम्यूनिकेशनचा मेल आयडी मोबाइलशी कनेक्ट करू नका.
5 अनोळखी मेलमधून आलेली कोणतीही अ‍ॅटचमेंट उघडू नका.
6 कोणतीही लिंक ओपन करण्याआधी युआरएल ठीक आहे का ते तपासा.
7 इनक्रिप्टेड मेलच पाठवा किंवा लिहा. संशयास्पद मेल ब्लॉक करा.

एक हजारपेक्षा जास्त महत्वाच्या व्यक्तींच्या डेटाची चोरी
चीनने भारतातील एक हजारपेक्षा जास्त महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी सुरू केल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ही हेरगिरी चीनच्या शेनजेन येथील जेनहुआ या डेटा इन्फरमेशन टेक कंपनीद्वारे होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जेनहुआ कंपनी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध आहे. ही कंपनी भारतात रिअल टाइम सर्व्हिलान्स मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने ही हेरगिरी कशी रोखायची असा मोठा प्रश्न देशासमोर आहे.