सावधान ! 3 वर्षांनी पुन्हा आला ‘हा’ भयानक Android व्हायरस, फक्त एक मेसेज अन् तुमचं अकाऊंट रिकामं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अत्यंत खतरनाक असा जुना अँड्रॉइड मालवेअर तीन वर्षांनंतर पुन्हा परतला आहे. तुमच्या बँकेचा तपशील आणि वैयक्तिक माहिती हा अगदी सहजपणे चोरू शकतो. ऑक्टोबर 2017 मध्ये या फेकस्काय नावाच्या मालवेअरचा तपास लागला होता. ज्याने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याने लक्ष्य केले होते. दरम्यान, ybereason Nocturnus च्या संशोधकांनुसार या व्हायरसने आता जगभरातील वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून चीन, तैवान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, युनायटेड ,स्टेट्स आणि इतर काही देशातील नागरिकांवर हा व्हायरस निशाणा साधत आहे.

या व्हायरसच्या माध्यमातून हॅकर्स डाक (पोस्टल) सेवेसंदर्भात संदेश पाठवून आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. यावेळीही या मालवेअरची नजर कोट्यवधी नागरिकांच्या बँक खात्यावर आहे. Smishing किंवा SMS फिशिंग हल्ला करून हा मालवेअर युजर्सना लक्ष्य करत असल्याचे अहवालात म्हंटले आहे. जो युजर्सना एक संदेश पाठवून एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगतो. युजर्सने हे अ‍ॅप डाऊनलोड करताच काही परवानग्या मागितल्या जातात. यात प्रक्रियेदरम्यान पहिल्या परवानगी नंतर मालवेअर तुमच्या मोबाइलमधील मेसेज वाचू शकतो, त्यांनत दुसऱ्या परवानगी नंतर तुमचे डिव्हाइस लॉक झाल्यानंतरही बॅकग्राऊंडमध्ये या व्हायरसचे काम सुरु असते.

एकदा का परवानगी मिळाली कि, तुमचा फोन नंबर, डिव्हाइस मॉडेल, OS व्हर्जन, टेलिकॉम प्रोव्हायडर, बँक डिटेल्स, IMEI नंबर आणि IMSI नंबर चोरी केला जातो. ज्याद्वारे तुमची सहज फसवणूक होते. काही संशोधकांनी म्हंटले कि, त्यांच्या विश्लेषणानंतर अशी माहिती मिळत आहे कि, या सर्व कारस्थानामागे एक चिनी बोलणारा ग्रृप Roming Mantis कार्यरत आहे. हा असा ग्रृप आहे, ज्याला काही वर्षांपूर्वी असेच एक कँपेन सुरू करण्यासाठी ओळखले जायचे’.