ICICI बँकेकडून ग्राहकांना ‘अलर्ट’ ! सल्ला स्विकारा अन्यथा रिकामं होईल अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी दुसरी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. या अशा घटनांपासून वाचण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. बँकेने ट्विट करून हि माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना सावध करताना सांगितले आहे कि, बँक कोणत्याही प्रकारे तुमचा एटीएम पिन विचारत नाही. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारे फोन आल्यास त्वरित सावध व्हा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकारापासून सावध राहा.

ट्विट करून बँकेने आपल्या ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टी सांगितल्या आहेत.

1) फोनवर एटीएम पिन सांगू नका –
तुम्हाला पिन मागण्यासाठी कोणत्याही प्रकारे फोन आल्यास त्याला आपला पिन सांगू नये. यामुळे तुमची फसवणूक होऊन तुमचे पैसे चोरी होऊ शकतात.

2) पैसे काढण्यासाठी आपला पिन का द्यावा –
बँकेत पैसे काढण्यासाठी बँक कोणत्याही प्रकारे तुम्हाला पिन विचारत नाही. त्यामुळे तुम्ही पिन देऊ नका.

3) तक्रार करा –
अशाप्रकारचा कोणताही फोन आल्यास त्वरित याची तक्रार करून तुम्ही फसवणूक होण्यापासून वाचू शकता. त्यामुळे आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी