सावधान ! LIC मध्ये गुंतवणूक करताय, ‘ही’ माहिती जाणून घ्या; अन्यथा तुमचे पैसे बुडण्याची भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेक जण विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. भविष्यात जास्तित जास्त फयदा मिळवण्यासाठी सरकारी योजनांमध्ये होणारी गुंतवणूक वाढत आहे. यातच ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर क्राईमची प्रकरणे समोर येत आहे. मगील काही दिवसांपासून अशा प्रकरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. काही भामटे LIC अधिकारी, एजंट किंवा विमा नियामक आयआरडीएचे (IRDA) अधिकारी बनून ग्राहकांशी संपर्क साधतात. त्यांना वेगवेळ्या योजनांची माहिती देऊन अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होते.

नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ग्राहकांना फोन केला जातो आणि त्यांना एखाद्या एलआयसी पॉलिसी संदर्भात माहिती सांगून त्याचे फायदे वाढवून सांगिंतले जातात. त्यामुळे काहीवेळा ग्राहक त्यांची सध्याची पॉलिसी सरेंडर करण्यासाठी तयार होतात. जर तुम्हाला असाच कुणाचा फोन आला असेल तर तुम्ही तक्रार करु शकता.

कंपनीचे प्रतिनिधी बनून दिशाभूल
भामटे ग्राहकांना एलआयसी पॉलिसी सरेंडर करण्यास सांगून त्यांना अधिक चांगले रिटर्न देण्यासाठी ग्राहकांकडून मोठी रक्कम फी म्हणून वसूल करतात. तर काही प्रकरणांमध्ये ग्राहकांनी दिलेली रक्कम खोटी आश्वासने देऊन इतर ठिकाणी गुंतवल्याचे सांगतात. अशा प्रकारे कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी बनून पॉलिसीधारकांची दिशाभूल केली जाते.

बनावट कॉलपासून सावध राहा
लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढल्याने एलआयसीने एक अलर्ट जारी केला आहे. यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याबाबत ग्राहकांना सूचवत नाही. कंपनीने ग्राहकांना या अशाप्रकारच्या नंबरवरुन आलेले फोन अटेंड न करण्याचे आवाहन केले नाही. एलआयसीने ग्राहकांना सूचित केले आहे की, त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांची पॉलिसी रजिस्टर करावी आणि त्याठिकाणी सर्व माहिती घ्यावी.

या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हाला कोणताही दिशाभूल करणारा कॉल आला तर [email protected] यावर तक्रार करावी.

एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकांकडे आहे.

अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा ज्याच्याकडे आयआरडीए द्वारे जारी करण्यात आलेला परवाना आहे किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र आहे.