home page top 1

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा ! ‘या’ 12 राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामान विभागानुसार येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्र आणि गुजरात काही भागात धो-धो पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुजरातच्या काही भागात नारंगी अलर्ट जारी केला आहे. शनिवारी गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्र, कोकण, गुजरात, गोवा, तमिळनाडू, अंदमान निकोबार, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पाँडीचेरी या भागात जोरदार पावसाच्या सरी बरसू शकतात.

12 राज्यात होऊ शकतो पाऊस
हवामान विभागाने झारखंड आणि ओडिशामध्ये वेगाने वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबतची चेतावणी देखील देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी असलेल्या भागात 65 किमी वेगाने वारे वाहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याबाबत इशारा दिला आहे.

दिल्लीत शनिवारी पावसाचे वातावरण असेल. वेगाने वारे वाहून पाऊन पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 सप्टेंबरला देखील अलर्ट घोषित करण्यात आला आहे. उद्या हवामान विभागाने उत्तरप्रदेशच्या 16 जिल्ह्यात जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like